श्री कुलस्वामी दूध संस्थेच्या बल्क कुलर चे उदघाटन; शेतकऱ्यांना पशु आहार विषयी मार्गदर्शन
1 min read
नळवणे दि.२३:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज यांच्या माध्यमातून नळवणे (ता.जुन्नर) येथे श्री कुलस्वामी सहकारी दूध उत्पादन संस्थेच्या
पाच हजार लिटर क्षमतेच्या बल्क कुलरचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी पशु आहार तज्ञ डॉक्टर बाळासाहेब सोबळे यांनी शेतकऱ्यांना पशु आहाराबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कात्रज दूध संघाच्या वतीने उपस्थित गवळ्यांना जनावरांसाठी मोफत गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जनावरांच्या आहारात कोणते बदल असावेत? गाईला गुळ चारल्याने दुधाला वाढ होते. जनावरांना उन्हाळ्यामध्ये जास्त वेळा पाणी पाजावे. खाद्याचा खर्च व दुधाचे उत्पादन याचा हिशोब ठेवावा. गोचीड व्यवस्थापनाची गरज आदी विषयांवर डॉक्टरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी जनावरांसाठी मोफत आरोग्य तपासणीची आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, कात्रज दूध संघाचे चेअरमन स्वप्निल ढमढेरे, कात्रज संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, भाऊ देवाडे, समर्थ कॉलेजचे वल्लभ शेळके, गावच्या सरपंच अर्चना उबाळे,
उपसरपंच सुवर्णा देशमुख, आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, शिंदेवाडी चे सरपंच अजित शिंदे, डॉक्टर्स कात्रज संघाचे अधिकारी, कर्मचारी, गवळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री कुलस्वामी दूध संस्थेचे चेअरमन सुरेश गगे, व्हाईस चेअरमन रामदास शिंदे, सचिव नामदेव गगे यांनी मानले.
