बाळासाहेब जाधव महाविद्यालयात गुरु पौर्णिमा व वृक्ष दिंडी सोहळा संपन्न
1 min read
आळे दि.१०:- बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष आणि एन.सी.एन.च्या वतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गुरु पौर्णिमा आणि वृक्ष दिंडी सोहळ्याचे आयोजन – बी. जे.कला वाणिज्य व विज्ञान आळे,
महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष आणि एन.सी.सी. विभागाने गुरु पौर्णिमा निमित्त वृक्ष दिंडी चे आयोजन केले होते, गुरु वंदन आणि वृक्ष दिंडी यासारख्या अध्यात्मिक सण साजरे करण्या मागे भारतीय संस्कृती चे जतन, पालन आणि विद्यार्थ्यावर अध्यात्मिक संस्कार करणे असे या उपक्रमाचे आयोजन करण्यामागचा हेतू आहे,
असे प्राचार्य डॉ प्रवीण जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक किशोर कुऱ्हाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात वृक्ष दिंडी सोहळा हा पर्यावरण जागृती साठी किती महत्वाचा आहे आणि महाविद्यालयीन युवक यात महत्वाची भूमिका बजावत आहे.
या साठी या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे माजी संचालक अरुण गुंजाळ अध्यात्मिक मार्गातून पारमार्थिक सुख अनुभवण्यासाठी लोभ जसा त्यागावा लागतो तसा यांनी विद्यार्थ्यांनी देखील सुसंस्कृत होण्यासाठी भक्ती मार्ग आणि अभ्यास करावा, असे प्रतिपादन केले.
सर्व महाविद्यालयाच्या एन.सी.सी. 2 महाराष्ट्र बटालियन च्या छात्र म्हणजे एक सळसळता उत्साह, यांनी अगदी टाळ मृदुंग यांच्या साथीने वृक्ष दिंडी सोहळ्याचे रिंगण महाविद्यालय परिसरात धरले. या सर्व विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक वृंदाचा झाडांची रोपे देऊन सत्कार केला आणि आपल्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी या विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवड करण्याचा संदेश दिला.यासाठी त्यांनी महाविद्यालय परिसर ते रेडा समाधी मंदिर ही पायी दिंडी काढली. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे या अभंगा वर दिंडी ची पाऊली झाली. या दिंडी सोहळ्यात प्रधानमंत्री कौशल्य योजनेचे नर्सिंग आणि अकाउंटिंग या शाखेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मेजर डॉ. सुषमा कदम महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष प्रमुख, प्रा. संजय वाकचौरे, सी. टी.ओ. शशिकांत भगत यांनी केले होते. डॉ.विलास गोरडे, डॉ.गिरिजाप्रसाद शिरसागर, डॉ संगीता भारती, डॉ मनिषा गिरी, प्रा संतोष राठोड, प्रा.योगेश माने प्रयोगशाळा परिचर बबन पाडेकर, भाऊ तितर,
सागर भुजबळ, राजू पाडेकर यांनी श्री रेडा समाधी मंदिर संस्थान येथे वृक्ष दिंडीत विद्यार्थिनी समवेत फेर धरला. आस्था फाउंडेशन च्या शिक्षिका वृषाली कुऱ्हाडे आणि सिद्धी गाडे देखील विद्यार्थ्या सोबत या वृक्ष दिंडीत उपस्थित होत्या. त्याचबरोबर ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके,
मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुळवले तसेच संचालक भाऊ कु-हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबु कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी गुरु पौर्णिमे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या
आणि वृक्ष दिंडी सोहळ्याचे मनापासून कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.एच.एम वैष्णवी भोर आणि सार्जंट गंगा यादव यांनी केले आणि सीनिअर अंडर ऑफिसर समीक्षा लामखडे हिनेआभार व्यक्त केले.
