व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा दिनी संस्कार, कृतज्ञता आणि भावनांचा संगम

1 min read

वडगाव कांदळी दि.१०:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील कृतज्ञतेचा सण अत्यंत भक्तिभावात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम इयत्ता 1 ली ते 10 वी विभागातील गुरुपौर्णिमेनिमित्तचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत शाळेच्या शिक्षिका स्वप्नाली भोर यांनी केले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे , समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे तसेच उपस्थित सर्व शिक्षकांनी विधिपूर्वक सरस्वती पूजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शिक्षिका धनश्री गवळी यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि गुरूंचे स्थान भारतीय संस्कृतीत किती महान आहे याविषयी विशेष माहिती दिली . याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या प्रवासात गुरूंचे स्थान सर्वोच्च असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांविषयी प्रेम, आपुलकी व कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शिक्षिका स्वाती पवार यांनी व्यक्त केले.यानंतर प्री-प्रायमरी विभागामध्ये (नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी) गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या माता पालकांचे पूजन करून त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त केली. या बालदिंडीत निर्मळ श्रद्धा व संस्कारांची प्रचिती मिळाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका नीलम शेळके व मानसी पाचपुते यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षिका तृप्ती डुंबरे यांनी केले.कार्यक्रमासाठी प्री प्रायमरी विभागातील माता पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले; व शाळेला शुभेच्छाही दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, तसेच समन्वयिका व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.या भक्तिपूर्ण कार्यक्रमास विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात गुरूविषयी आदर, मूल्यसंस्कार आणि भारतीय परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले, हे विशेष.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!