देव प्रशालेत किशोरवयीन मुलींना कळी उमलताना आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर
1 min read
Oplus_131072
बोरी दि.१०:- डिसेंट फाऊंडेशन पुणे यांचे वतीने गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला, बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथे किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना या आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई,फाउंडेशनचे सदस्य डॉ.मुक्तांजली पोथरकर, डॉ. एफ.बी. आतार, आदिनाथ चव्हाण, वैशाली संभाजी काळे, प्रांजल काळे, पोलिस पाटील अक्षय काळे, माजी विद्यार्थी अक्षय काळे, संभाजी शेटे उपस्थित होते.
जि.प.प्राथमिक शाळा आणि देव प्रशालेतील सर्व किशोरवयीन मुलींना डॉ.पोथरकर यांनी किशोरवय,मासिक पाळी व घ्यायची काळजी, जेंडर,आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीतील समस्या व घ्यावयाची काळजी गैरसमज,मैत्रिणीकडून मिळणारे चुकीचे सल्ले याबद्दल माहिती दिली.
लैंगिक व आरोग्य विषयी चुकीच्या मिळालेल्या माहितीमुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. किशोर वयात मुले व मुली यांमध्ये निर्माण होणारे परस्पर आकर्षण, मानसिक आरोग्य, धोके, सामाजिक समस्या, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारे प्रश्न याबद्दल सचित्र अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली.
मुलींच्या आईने मैत्रीण बनून मार्गदर्शन करायला हवे असे आवाहन त्यांनी केले.आतार यांनी किशोरवय व मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले. बालवय हे खूप चंचल व भावनाप्रधान असते त्यामुळे मुलींनी आपले मित्र मैत्रीण निवडताना खूपच जागृत असायला हवे. मुलींनी समाजात वावरताना दिवसभर घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत आपल्या पालकांशी मुक्त संवाद साधला.
पाहिजे.पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांसाठी विशेष जागरूक असले पाहिजे असे प्रतिपादन केले.जिल्हा परिषद पुणे यांनी तयार केलेली मार्गदर्शन पुस्तिका व सॅनिटरी पॅडचे मुलींना वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी डिसेंट फाऊंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फाऊंडेशनचे समन्वयक योगेश वाकचौरे यांनी विशेष सहाय्य केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक संजय धायबर,अमित शेटे,रूपाली कोरडे,वैशाली कुऱ्हाडे,हर्षदा जाधव,सोनल जाधव, शकिला मणियार, सेवक रवींद्र जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शमशुद्दिन पटेल यांनी केले तर मान्यवरांचे आभार उपशिक्षक विजय चव्हाण यांनी मानले.
