मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला १३५ रुपये बाजारभाव
1 min read
मंचर दि २९:-कांद्याच्या बाजारभाव वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. मंचर बाजार समितीत आंबेगाव तालुक्याबरोबरच खेड व शिरूर तालुक्यातूनही कांद्याची आवक झाली. आठवड्यातील रविवार, मंगळवार व गुरुवार या तीन दिवशी कांद्याची लिलाव पद्धतीने सर्वांसमक्ष विक्री केली जाते.
आगामी काळात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.”मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रविवारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या कांदे कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठ-दहा दिवसाच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली आहे. दहा किलो कांद्यास १३५ रुपये बाजार भावमिळाला.
मंचर बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे व संचालक निलेश थोरात म्हणाले ” कांद्याचे बाजार भावदहा टक्क्यांनी वाढले आहेत. एक नंबर गोळा कांदा दहा किलो 120 ते 135 रुपये या भावाने विकला गेला आहे. सुपर कांदा 80 ते 100 रुपये, गुलटी कांदा 40 ते 60 रुपये तर बदला कांदा 10 ते 30 रुपये अशा प्रतवारीनुसार कांद्याला दहा किलोस बाजारभाव मिळाला आहे.
सध्या नवीन कांद्याची आवक बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पावसाळा जवळ येऊ लागल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्याची व्यवस्था नाही त्यांनी तो विक्रीसाठी बाजारात आणला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा बराखित साठवून ठेवला आहे. शेतकरी बाजार भाव वाढतील या प्रतीक्षेत आहेत.
मंचर बाजार समितीत मागील काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव स्थिर होते रविवारी अकरा हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. लिलाव सुरू झाला तेव्हा कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झालेली आहे. भालेराव यांनी सांगितले.