आळेफाटा कृषीउत्पन्न बाजार समितीत २३ हजार कांदा पिशवी आवक; १६१ रुपये बाजारभाव

1 min read

आळेफाटा दि.६ :- कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत दुय्यम बाजार आवार आळेफाटा येथे मंगळवार दिनांक ६ रोजी २३ हजार १०१ कांदा पिशव्यांची आवक झाली. यामध्ये गोळे कांदा नंबर १ प्रति दहा किलोसाठी 140 ते 161 रुपये, सुपर कांदा नंबर २, 125 ते 140, सुपर मेडीयम कांदे 2 नंबर -100 ते 120, गोल्टी व गोल्टा कांदे 3 नंबर 50 ते 90, चींगळी कांदे (लहान) 4 नंबर- 40 ते 70, बदला कांदे5 नंबर -30 ते 60, हलका कांदा सिंगल पत्ती मेडीयम व मोठा- 50 ते 90 रुपये असा बाजार मिळाला. कांद्याला ५० रुपये हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे