शुभम तारांगण गृह प्रकल्प जपतोय पर्यावरणाचा समतोल

1 min read

आळेफाटा दि २३:- पर्यावरणाचा होत असणारा ऱ्हास टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा पुरेपूर पुनर्वापर केला पाहिजे. तसेच टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करून त्यांचा देखील पुनर्वापर केला पाहिजे. असाच आदर्श समोर ठेवून शुभम तारांगण या हरितगृह प्रकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प केल्याने येथे आरोग्यविषयक समस्या म्हणजे दुर्गंधी, साफसफाई व स्वच्छता यांच्यावर नियंत्रण ठेवता आले आहे.

सोसायटीमध्ये तयार होणारा ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते व त्यापासून तयार होणारे खत हे सोसायटीतील झाडांना तसेच शेतीसाठी देखील दिले जाते. म्हणूनच अशा सुंदर  प्रकल्पांमुळे शुभम डेव्हलपर्स निर्मित शुभम तारांगण ह्या हरितगृह प्रकल्पाला इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्याकडून प्लॅटिनम रेटिंग हा मान मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे