‘शुभम तारांगणचा’ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प : पर्यावरणास ठरतोय वरदान

1 min read

आळेफाटा दि.२१:- वाढत्या शहरीकरणाने सर्वत्र सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पण सोबतच काही गैरसोयी निर्माण झाल्या हे वास्तव आहे. त्यातील सर्वत्र भेडसावत असणारी गंभीर समस्या म्हणजे – सांडपाणी. ज्यामुळे अनेक साथीचे आजार, प्रदूषण यांना आमंत्रित केले जाते. पण जशी समस्या मानवनिर्मित आहे, तसा त्यावर उपायही शोधला गेला आहे तो म्हणजे – सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प.

हा प्रकल्प जुन्नर तालुक्यात बहुतेक प्रथमच उभारला आहे तो आळेफाटा येथील “शुभम तारांगण” या हरितगृह प्रकल्पात. यामध्ये सर्व सदनिकांचे सांडपाणी एकत्रित करून त्याचे शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा गृहप्रकल्पातील सर्व बगीचा आणि शौचालयातील फ्लश टॅंक यासाठी पुनर्वापर केला जातो. या मार्फत दैनंदिन सुमारे २ लक्ष लिटर पाणी पुनर्वापरात आणून तितक्याच पाण्याची नव्याने बचत केली जाते.

या प्रकल्पाचे फायदे पाहता हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने नक्कीच एक वरदान ठरत आहे. “शुभम डेव्हलपर्स” आपल्या लौकिकाप्रमाणे नेहमीच नाविन्यपूर्ण व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आदर्शवत असे प्रकल्प उभारत असतात त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे पर्यावरण पूरक असणारा “सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प”.


तालुक्यातील सर्वच विकसनकर्ते, गृहप्रकल्प व तमाम नागरिकांनी या पद्धतीने उपाययोजना करून पर्यावरणाचा समतोल कसा राखावा हे उपजत करून घ्यावे तसेच शालेय विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक दाखवून आपण त्यांना एक चांगला सामाजिक संदेश देऊ शकतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे