इराण-इस्रायल युद्धाच्या झळा ! गॅस सिलिंडर महागणार; फक्त ‘इतके’ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा

1 min read

पुणे दि.२४:- इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. काल अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर आणखी तणाव वाढला आहे, या युद्धाचा परिणाम आता जगावर होणार आहे. भारतातही एलपीजी गॅसवर याचा परिणाम होणार आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीनपैकी दोन एलपीजी सिलिंडर पश्चिम आशियातून येतात. जर या प्रदेशात तणाव वाढला आणि पुरवठा विस्कळीत झाला तर सर्वात पहिला सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम सिलिंडरच्या दरांवर दिसून येतो. कारण देशातील प्रत्येक 3 एलपीजी सिलिंडरपैकी 2 पश्चिम आशियातून येतात. इराणच्या तीन मुख्य आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीती आणखी वाढली आहे. आयात टर्मिनल्स, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवण क्षमता राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त 16 दिवसांसाठी पुरेशी आहे. गेल्या दशकात, सरकारी प्रयत्नांमुळे भारतातील एलपीजीचा वापर दुप्पट होऊन 33 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे देशाचे आयातीवरील अवलंबित्व वाढले आहे. एकूण एलपीजीपैकी सुमारे 66% परदेशातून येते आणि त्यापैकी सुमारे 95% सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून गॅस येते. अमेरिका, युरोप, मलेशिया किंवा आफ्रिकेच्या काही भागांसारख्या पर्यायी स्रोतांमधूनही एलपीजी आयात करता येते, पण या देशांमधून भारतात माल पोहोचण्यास जास्त वेळ लागेल. दुसरीकडे, पाईपद्वारे नैसर्गिक वायू फक्त 1.5 कोटी भारतीय घरांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे देशातील 33 कोटी एलपीजी कनेक्शनसाठी हा एक पर्याय नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!