नळवणे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गुणवंतांचा सन्मान
1 min read
आणे दि.१४:- सरपंच अर्चना उबाळे यांनी ग्रा.पं.च्या वतीने नळवणे गावामध्ये सरदार पटेल हायस्कूलच्या १० वी बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या काव्या अरुण दाते व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या आर्या विठ्ठल गगे तसेच 85 % पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या साधना पांडुरंग आहेर या सावित्रीच्या लेकींचा प्रत्यक्ष घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शा.व्य.समितीचे अध्यक्ष बंडु आहेर,माजी उपाध्यक्ष सुरेश गगे,.गणेश देशमुख,स.प.हाय.चे शिक्षक तुषार आहेर,प्रसाद शिंदे तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
या घरगुती समारंभात महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी सरपंच उबाळे यांनी शुभेच्छा दिल्या.