मॉडर्नची शर्वरी भांबेरे ९८.४० टक्के मिळवून जुन्नर तालुक्यात पहिली
1 min read
Oplus_131072
बेल्हे दि.१५:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) इयत्ता १० वी व १२ वी सीबीएसई बोर्ड चा शैक्षणीक वर्ष २०२४-२५ चा निकाल लागला असून १० वी ची शर्वरी विनोद भांबेरे हिने ९८.४० टक्के गुण मिळवून जुन्नर तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला असून मॉडर्न इंग्लिश स्कूल जुन्नर तालुक्यात अव्वल शाळा ठरली असल्याची माहिती प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली.

दहावीच्या वर्गातून प्रथम क्रमांक भांबेरे शर्वरी विनोद ९८.४०, द्वितीय बांगर साईराज शिवाजी (९४ टक्के), तृतीय क्रमांक गांधी ओम रसिक (९२.४० टक्के) याने पटकावला.

तसेच बारावीच्या वर्गातून प्रथम क्रमांक आतकरी दर्शन किसन (७३.८० टक्के), द्वितीय क्रमांक बोरचटे निशांत शिवाजी ७३.४० टक्के) तर तृतीय क्रमांक बांगर प्रतीक्षा गणेश ७२.६० टक्के) याने पटकवला. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ,
अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे,सर्व संचालक मंडळ, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

