अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने सामाजिक संस्थांचा गौरव
1 min read
आळेफाटा दि.१४:- जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्याला आधार देणाऱ्या परिसरातील निराधार व गरजू वृद्ध व्यक्तींसाठी ग्रामस्थांच्या साह्याने अन्नपूर्णा संस्था आळे, संकल्प बहुउद्देशीय अन्नपूर्णा युवा संस्था केंद्र राजुरी, या संस्थांच्या माध्यमातून परिसरातील निराधार व गरजू वृद्ध व्यक्तींसाठी दिवसातून दोन वेळा पुरेन इतके जेवणाचे डबे दिले जातात.
तर स्वप्नवेद संस्था मंगरूळ या संस्थेच्या माध्यमातून निराधार अशा लहान बाळांना अनाथ मुलांना पालकत्व देऊन त्यांचे पालन पोषण करणाऱ्या संस्थेचा व तसेच सेवाभावी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कार्य गौरव सोहळा शुक्रवार दि. 12 मे 2023 रोजी आळेफाटा येथे भारत भवन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर आयोजित अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्य सेनानी ग्राहक तीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या आठव्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक उपक्रमशील दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर मंदार जवळे, हभप बळवंत महाराज औटी, नेताजी दादा डोके.
सुरेखा वेठेकर, ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, पुणे जिल्हा महिला प्रमुख वैशाली असले , भास्कर गाडगे, तुषार वामन ,देविदास काळे, ज्ञानेश्वर शेळके ,एम डी घंगाळे हे उपस्थितीत होते तर ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, तालुका संघटक शैलेश कुलकर्णी, महिला संघटक कौशल्याताई फापाळे, तालुका कोषाध्यक्ष देवराम तट्टू, मंदा पोटे, संतोष नेहरकर, नंदाराम भोर,रंजना डुमरे, अदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.