कल्याण-नगर महामार्गावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार
1 min read
राजुरी दि.१०:- राजुरी (ता.जुन्नर) या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी लक्ष्मण शिरतर (वय-६०) रा.राजुरी ता.जुन्नर हे मंगळवार (दि.९) बेल्हे या ठिकाणी कामानिमित्ताने गेले होते. काम झाल्यानंतर ते घरी येत होते. नगर -कल्याण महामार्गावर राजुरी गावाजवळ असलेल्या हॉटेल सुरभी जवळून पायी जात असताणा पाठीमागून आलेल्या एका अज्ञात मोटारसायकल ने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांणी त्यांना उपचार करण्यासाठी आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी नेले होते परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मुत्यू झाला. याबाबतची फिर्याद योगेश शिवाजी शिरतर याने आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.