कुकडी डाव्या कालव्यातून २२ जूनपर्यंत चौथे आर्वतन सोडण्यात येणार:- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

1 min read

पुणे दि.१०:- लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात कुकडी डाव्या कालव्यातून २२ जूनपर्यंत चौथे आर्वतन सोडण्यात येणार आहे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.पाटील म्हणाले, ”धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे.या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल, याकडे लक्ष द्यावे. धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होते.

त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे. पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील १५ कि. मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजुरीनंतर सुरुवात करावी.”कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झाली. आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार.

कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे