संकल्पच्या कार्याचा सेवा भावी पुरस्कार देऊन सन्मान

1 min read

आळेफाटा दि.१३ :-अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व थोर स्वातंत्र्य सेनानी,तथा ग्राहकतीर्थ स्वर्गीय. बिंदूमाधव जोशी यांच्या पुण्यस्मरणार्थ “सामाजिक उपक्रम शील दिन“आळेफाटा येथे सालाबादप्रमाणे साजरा करण्यात आला.

जुन्नर तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या विद्यमाने तसेच मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील सर्व सामान्यांना आधार देणाऱ्या समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या सेवाभावी संस्था व समाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान चिन्ह देऊन कार्यगौरव करण्यात आला.


सदर कार्यक्रमात संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्थेचा “संकल्प अन्नपूर्णा केंद्र” याच्या माध्यमातून मागील सहा वर्ष वयोवृद्ध व निराधारांना मोफत जेवण पुरवण्याच्या अविरत कार्याची दखल घेऊन संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष जीलानी पटेल यांनी पुरस्कार स्वीकारला.


सदर कार्यक्रमात जुन्नर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,सामाजिक आर्थिक व शैक्षणिक संस्थेचे अनेक पदाधिकारी तसेच ग्राहक चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते व जुन्नर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे