बेल्ह्यात बिबट्या जेरबंद; अनेक पाळीव प्राण्यांवर केले होते हल्ले
1 min read
आणे दि.२३:- बेल्हे (ता.जुन्नर) येथे ऊसाच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट जेरबंद झाला आहे. बुधवार दि.२३ रोजी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. सदर बिबट्याची रवानगी माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे. अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली आहे.बेल्हे परिसरात या बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला होता. अनेक पाळी प्राण्यांवरती बिबट्याने हल्ले केले होते. या ठिकाणी तीन शाळांच्या मध्ये हा बिबट्या जेरबंद झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे, बेल्हेश्वर हायस्कूल तसेच मॉडर्न इंग्लिश स्कूल अशा तीन शाळा या परिसरात आहेत.
यातील शाळांच्या मधोमध हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वाढत्या बिबट्यांमुळे परिसरात विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.