शिरोली तर्फे आळे जेष्ठ सामाजिक नेतृत्व धोंडिभाऊ खिलारी यांचे निधन

1 min read

शिरोली दि.२३:- शिरोली सुलतानपूर येथील धोंडीभाऊ रघुनाथ खिल्लारी वय ६९ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.गावच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी कायमच समाजातील गोर गरीब लोकांना मदत केली. माणूस हा समाजशील आहे. तो समाजाशिवाय राहूच शकत नाही. हे त्यांच्या अंत्यविधी आणि दशक्रिया कार्यक्रमाच्या दिवशी जमलेल्या गर्दी वरून दिसून आले. समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे हे स्वतः अंगीकारून तीच शिकवण त्यांनी आपल्या दोन्ही मुले रोहित आणि अविनाश यांना दिली. त्यांची ही आपले कुटुंब आणि व्यवसाय सांभाळून गावच्या विकासाप्रति असलेली तळमळ वेळोवेळी दिसून येते. म्हणूनच वडील गेल्यानंतर आपण काहीतरी समाजाचं देण लागतो या भावनेतून दोन्ही बंधूनी चारणं बाबा मंदिरासाठी 1 लक्ष, गावच्या मुख्य चौकात 65000/-किमतीचा हाई मॅक्स, गावातील दोन्ही शाळांना देणगी स्वरूपात मदत केली. या पुढेही या परिवाराकडून अशीच सेवा घडेल यात कोणती शंका नाही. रोहित आणि अविनाश आणि संपूर्ण परिवाराच्या या दुःखात आपण सर्व जण सहभागी आहोत. कै. धोंडिभाऊ (नाना )खिलारी यांना आपणा सर्वाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे