कुटुंबीयांनी सखू आजीचा थाटात केला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
1 min read
आळे दि.२१:- जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथील सखुबाई मारुती दिघे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला. सुखबाई दिघे या १०१ वर्षाच्या निरोगी असून विशेष म्हणजे त्यांना अद्याप गोळ्या, औषधे डॉक्टर चालू नाही. या सोहळ्यानिमित्त कुटुंबियांनी गोंधळ, श्री सत्यनारायण महापूजा, श्री कुलस्वामी खंडेरायांचे जागरण, ह भ प उज्वलाताई वाळके यांचे व रामानंद स्वामी महाराज यांची प्रवचन असे विविध कार्यक्रम ठेवले होते. यावेळी आजीची मिठाई तुला करण्यात आली तसेच १०१ दिव्यांनी आजींना ओवाळून १०१ व्या वाढदिवसाचा आजीने केक कापला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आजीला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तर उपस्थितांचे आभार दावला दिघे, गोरक्ष दिघे, गणेश दिघे व दिघे कुटुंबियांच्या वतीने मानण्यात आले. आजी काठी टेकून चालते, दाट अजून शाबुद आहेत, स्पष्ट ऐकू ही येते.
सखू आजीला ४ मुली, एक मुलगा, सुना, नातवंड, पतवंड असा परिवार आहे. सखू आजीच्या मुली थकल्या आहेत परंतु आजी अजून कणखर आहे. माणसाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय काय काय करतात परंतु हयात असताना एवढा मोठा सोहळा केल्यामुळे परिसरातून दिघे कुटुंबीयांचा कौतुक होत आहे.