अमरावती विमानतळाचे उद्घाटन, प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ
1 min read
अमरावती दि.१७:- अमरावती विमानतळाचे उद्घाटन, प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ व एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. स्टेट ऑफ आर्ट असलेले विमानतळ व पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार त्यांनी सांगितले.येत्या काळात सिंचन, पायाभूत सुविधा यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवान प्रवासाच्या सुविधा निर्माण करण्यात येतील. विदर्भातील विकासात्मक कामे पूर्ण करून या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.