बोकडाचा बळी देण्यासाठी चालेली Scorpio कोरड्या नदीपात्रात कोसळली; चौघांचा मृत्यू, बोकड मात्र वाचला; काय घडलं? वाचा सविस्तर

1 min read

जबलपूर दि.१३:-मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जबलपूर परिसरामध्ये एका कारचा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे बळीसाठी चालवलेला बोकड या अपघातातून वाचला आहे. चौघांचा मृत्यू झाला मात्र पूजेनंतर बळी देण्यासाठी जो बोकड या गाडीमधून घेऊन जात होते तो बोकड सुरक्षितरित्या वाचला आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की पटेल कुटुंब पुजेनंतर बोकडाला बळी देण्यासाठी घेऊन निघाले होते. ते ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्या भरधाव एसयूव्हीवरचा चालकाचा ताबा सुटला आणि ही कार पुलाचा कठाडा तोडून तब्बल तीस फूट खोल कोरड्या नदीत कोसळली. या घटनेत पटेल कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र ज्या बोकडाचा बळी दिला जाणार होता, ते बोकड या अपघातामधून वाचलं आहे.चारगव्हाण- जबलपूर रस्त्यावर शुक्रवार दि.११ दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. किशन पटेल वय 35, महेंद्र पटेल वय 35, सागर पटेल वय 17 आणि राजेंद्र पटेल वय 36 असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर जितेंद्र पटेल वय 36 आणि मनोज प्रातप हे दोघे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण नरसिंहपूरला गेले होते, तिथे बोकड आणि कोंबडं प्रतिकात्मकपणे अर्पण करून ते जबलपूरच्या दिशेनं परतत होते. घरी आल्यानंतर ते मटण आणि चिकणाचा कार्यक्रम करणार होते. मात्र वाटेतच काळानं घाला घातला हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. कोंबड्याचा देखील मृत्यू झाला. मात्र बळीसाठी जे बोकड घरी चालवलं होतं ते सुरक्षित आहे, या अपघातामध्ये फक्त त्याच्या कानाला जखम झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे