समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर
1 min read
नागपूर दि.११:- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आहेत.पुण्याकडून कार वाशिमकडे चालली होती. त्यावेळी पहाटे हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर चेनेज 268 येथे पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
पुण्याहून वाशिमकडे जाणारी एक भरधाव कार समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या धडकेनंतर कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या कारचालकाला पहाटे डुलकी लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.