अपहरण झालेल्या मुलीची सुटका; गुन्हे शाखेची कारवाई

1 min read

श्रीगोंदा दि.११:- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून अपहृत मुलीची सुटका करण्यात आली असून आरोपीस बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अनिल अंबादास वैरागर (वय ३६, रा.मिरी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर), असे अपहरण केलेल्या संशयिताचे नाव आहे.बेलवंडी पोलीस ठाण्यात एका पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार अनिल वैरागर याने मुलीचे अपहरण केले आहे, अशी माहिती समजली. तसेच हा आरोपी शिरूर येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे