मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर
1 min read
मुंबई दि.११: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याचे प्रत्यार्पण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. एनआयएने आज राणाला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर करणार आहे. यावेळी तहव्वूर राणाच्या वतीने आज वकील पीयूष सचदेवा त्यांची बाजू मांडणार आहेत.दरम्यान तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांनी राणाला अटक केल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.
पीयूष सचदेवा मांडणार तहव्वूर राणाची बाजू तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे जो अमेरिकेत राहत होता. अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी त्याला विविध दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याबाबत दोषी ठरवले होते. दरम्यान तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर इथे त्याचा खटला कोण लढणार.
असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. आता एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाचा खटला दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा लढवणार आहेत. ते न्यायालयात तहव्वुर हुसेन राणा याचे प्रतिनिधित्व करतील.
राष्ट्रीय तपास संस्थेचे निवेदन तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर एनआयएने एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने १६ मे २०२३ रोजी राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले. यानंतर राणाने नाइन्थ सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये याला आव्हान दिले होते.
परंतु त्याचे आव्हान फेटाळण्यात आले होते. त्यानंतर त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातही अनेक याचिका दाखल केल्या होत्या. परंतु या याचिका देखील फेटाळण्यात आल्या होत्या. अमेरिकेच्या न्याय विभाग आणि अमेरिकेच्या स्काय मार्शलच्या मदतीने,
एनआयएने भारतीय गुप्तचर संस्था आणि एनएसजी यांच्या सहकार्याने राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पार पाडली आहे.”न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यापूर्वी,
पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यम प्रतिनिधी आणि सामान्य लोकांना न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढण्यात आले आहे.दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान हे न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहेत.
पण, त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात लोकांना प्रवेश नाकारण्यामागे सुरक्षेचे कारण असल्याचे नमूद केले.