बदगीचे सरपंच प्रणेश शिंगोटे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

1 min read

अकोले दि.९:- स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2025 बदगी गावचे विद्यमान सरपंच प्रणेश किसन शिंगोटे यांना जाहीर झाल्याची माहिती स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेते बाळासाहेब पावसे यांनी दिली. हा पुरस्कार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वा. माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे मराठी चित्रपट सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. लहान ग्रामपंचायत तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत काम करायचे मोठे आव्हान व मोठी जिद्दीची गोष्ट असते. त्यात गावातील जुने राजकारण, गट तट या सारख्या अनेक आव्हानांवर मात करत गावचा विकास करण्याचे ध्येय मनाशी बाळगून सरपंच प्रणेश शिंगोटे यांनी गावातील सर्वांच्या मदतीने अनेक विकासकामे केली.सरपंच शिंगोटे यांनी दोन वेळा बदगी गावचे सरपंच पद भूषवले असून त्याच्या काळात गावात अनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक स्थळे यांचा विकास, गावातील पाणी योजना, गावची विहिर नूतनीकरण, नविन विहीर खोदकाम, विहीर पुनर्भरण या सारखी अनेक विकास कामे गावात झाली. या सर्वाची दखल घेत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सरपंच सेवा संघ यांच्या वतीने दिला गेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे