पादीरवाडीत कानिफनाथ यात्रोत्सव व भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन अतुल बेनके यांच्या हस्ते

1 min read

वडगाव आनंद दि.३०:- जुन्नर तालुक्यातील पादीरवाडी (वडगाव आनंद) येथे कानिफनाथ यात्रोत्सव व गुढीपाडवा निमित्त आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा जीवाभावाचा खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीचा रोमांचक यात्रेकरूनी अनुभव घेतला.गावकऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. अतुल बेनके यांनी सदर बैलगाडा घाटाचे काम केल्याचे समाधान बैलगाडा शौकिनांना वाटले. सदर प्रसंगी वडगाव आनंदच्या लोकनियुक्त सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच गणेश भुजबळ, माजी उपसरपंच ऋषिकेश गडगे, नाथा पादीर, सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गडगे, प्रफुल इथापे, कल्पना पादीर, वैशाली देवकर, गोरक्षनाथ देवकर, बारकू गडगे, संतोष पादीर, शोभा शिंदे, वंदना शिंदे, अर्चना काशीकेदार, अश्विनी चौगुले, युवा नेते सचिन पादीर, राज पादीर, मयूर गाडेकर, लहूदादा पादिर, संपत पादिर, कानिफनाथ महाराज यात्रा कमिटी अध्यक्ष गोरक्ष पादीर, उपाध्यक्ष वैभव पादीर, तसेच वडगाव आनंद, पदिरवाडी,आळेफाटा मधील समस्त ग्रामस्थ व तमाम बैलगाडामालक व शौकीन उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे