ज्ञानराज मध्ये ‘एक शाम जवानों के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन
1 min read
आळे दि.२८:- जुन्नर तालुक्यातील आळे येथील ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित ज्ञानराज इंग्लिश मेडीअम स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज महाविदयालयात भारतीय सैन्य दलातील जवानांसाठी एक शाम जवानों के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय सैन्य दलात भारतीय युवांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच देश सेवेत समर्पित होण्यासाठी भारतीय सेनेतील १०२ मिडीयम रेजिमेंट (एस.पी.) युनिट यांची सायकलिंग टीम जिचे नाव वज्र सायकलिस्ट असून त्यामध्ये एकूण २७ समर्पित जवान शामिल होते.
युवकांनी भारतीय सैन्यात सामील होण्याच्या उद्देशाने या टीमने झाशी ते पुणे ही यात्रा प्रारंभ केली. ज्ञानराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने शाळेतील प्राचार्य गुलाब बबन बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम वज्रसायकलीस्ट या टीमचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे शिक्षिका प्रतिमा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष नेताजी डोके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी देव्यांश भंडारी यांचे पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले.
त्यानंतर अतिथी उस्मान अन्सारी यांचे स्वागत प्राचार्य जी. बी. बोऱ्हाडे यांनी केले. मुकेश कुमार यांचे स्वागत संचालक- पांडूरंग वाघचौरे यांनी केले. त्यानंतर शिवनेरी माजी सैनिक संघ, (जुन्नर तालुका) पदाधिकारी निलेश शेळके, नवनाथ गाढवे, रामदास डावखर, रामदास पाडेकर, संभाजी वाळुंज,
प्रगतशील शेतकरी सावळेराम पाडेकर, अध्यक्ष, जेष्ठ नागरिकसंघ भागाजी शेळके, अध्यक्ष, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट नागु कुऱ्हाडे यांचे स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे वज्र सायकलीस्ट जवानांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दिव्यांश भंडारी यांनी राबविलेल्या वज्र सायकलिस्ट मोहिमे संदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर देशसेवा परमोधर्म असा संदेश देत विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य जी. बी. बोऱ्हाडे यांनी दिली.