गुंजाळवाडीत ४१ लाभार्थ्यांना मिळाले घरकुल:- सरपंच नयना गुंजाळ

1 min read

गुंजाळवाडी दि.३०:- गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील ४१ लाभार्थ्यांना घरकुल मिळाले असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून

खुल्या गटातील २३ लाभार्थ्यांना घरकुल मिळाले.तर दिव्यांग यशवंत घरकुल योजनेतून २ लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे.तर एस सी ८, मायनॉरिटी ७, मोदी आवास १, लाभार्थ्यांना असे एकूण ४१ लाभार्थी या योजनेसाठी पात्र झाले असल्याची माहिती सरपंच नयना गुंजाळ, उपसरपंच गोविंद सिताराम गुंजाळ यांनी दिली.ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार व ग्रामविकास पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनच्या वतीने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे. यातील काहींनी घरचे काम सुरू केले आहे. या योजनेतून १ लाख २० हजार रुपये थेट अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होते. यामध्ये मजुरीसाठी पहिला हप्ता १५ हजार रुपये, जोता पातळीपर्यंत काम आल्यानंतर दुसरा हप्ता ७० हजार रुपये, छज्या पातळीला काम आल्यावरती तिसरा हप्ता ३० हजार रुपये, तर घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर चौथा हप्ता ५००० हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा जमा होतो.

या व्यतिरिक्त तर मगाराग्रारोहयो अंतर्गत २६ हजार ७३० रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ५८ हजार ७३० रुपये लाभार्थ्यांना या योजनेतून मिळतात. असल्याची अशी माहिती ग्रामविकास अधिकारी वर्षा लोंढे यांनी दिली. परंतु सध्या मजुरी व मालाच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे हे घर या किमतीमध्ये बांधून होत नसल्याची चिंता लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे