राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता

1 min read

मुंबई दि.२९:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे,

तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यात उष्णतेच्या पारा दिवसागणिक वाढत असताना चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगलीसह अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील ३ दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे.दरम्यान, अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. सांगलीमध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील ३ दिवसात आणखी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ होत असल्यामुळं दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ

आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होत असताना हवामान खात्याकडून याबद्दलचा मोठा इशारा देण्यात आलाय.

परिणामी अवकळी पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे