म्यानमार-थायलंडमध्ये शक्तीशाली भूकंपाने हाहाकार; मृत व जखमींची प्राथमिक आकडेवाडी समोर

1 min read

बँकॉक दि.२९:- म्यानमार-थायलंडमध्ये शक्तीशाली भूकंपाने हाहाकार उडाला असून ७.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत १४४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर ७०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.भूकंपानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. भूकंपानंतर सर्वत्र एकच धावाधाव झाली. म्यानमारच्या मांडले, ताऊंगू सारख्या शहरातही अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे ३० मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले. म्यानमारमध्ये दोन भूकंप झाले. दोन्ही भूकंप प्रत्येकी ७.७ तीव्रता आणि ६.४ तीव्रतेचे झाले. दोन भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाले आहेत. म्यानमारचे जुंटा प्रमुख मिन आंग ह्लाइंग यांनी मृताचा आकडा वाढण्याच शक्यता व्यक्त केली आहे. बँकॉकमधील ३० मजली इमार कोसळल्यामुळे ३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ९० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.म्यानमारमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर मांडले शहरात ६.५ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे म्यानमारसहित थायलंड,भारत,बांगलादेश आणि चीन सारख्या देशांनाही बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमार होता. दोन भूकंपामध्ये १२ मिनिटांचा फरक होता. शहरातील अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशामध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. केंद्रबिंदू म्यानमार असलेल्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये किती वित्तहानी झाली आहे. याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. म्यानमारच्या स्थानिक वेळेनुसार दुपारच्या वेळेस झालेला भूकंप १० किलोमीटर खोलवर होता. या भूकंपामुळे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, नोएडा आणि गाझियाबादमध्ये जमीन थरथरू लागल्याने लोक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे