मुंबईतील धारावीत गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग; सिलेंडरचे एकामागून एक स्फोट

1 min read

मुंबई दि.२५:- मुंबईतील धारावी येथे आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली.यानंतर एकामागे एक सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या तरी या आगीत कुठल्याची जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. पण या गाडीत मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. धारावी बस डेपोजवळ ही घटना घडली आहे.धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. यानंतर गाडीत असलेल्या सिलेंडरचा एकामागे एक स्फोट होत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बस डेपोजवळच ही घटना घडल्यामुळे परिसरात मोठी वर्दळ असते. तसेच घटना घडली तिथे गाड्यांची पार्किंग होती. त्यामुळे अनेक दुचाकी आगीत जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.या परिसरात धारावीत नो पार्किंग झोन असतानाही धोकादायकरित्या गॅस सिलींडर भरलेल्या गाड्या पार्क करणे बेजबाबदारीचे लक्षण आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी अशा प्रकारचे धोकादायक ट्रक येथे नेहमीच येथे पार्क केले जातात. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. पालिकेचे एवढे मोठे बजेट काय कामाचे असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या सिलींडरच्या स्फोटाने संपूर्ण धारावी परिसरात घबराट पसरली आहे. या स्फोटात अजूनही कोणी जखमी झाले की नाही? याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे