सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘स्नेहसंमेलन’ उत्साहात संपन्न
1 min read
राजुरी दि.२३:- महारिया चारीटेबल ट्रस्टचे सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष २०२५, दिनांक १७ ते २२ मार्च दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे उपअध्यक्ष किशोर पटेल, सेक्रेटरी गणपत कोरडे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण,
संचालक नागेश आस्पात, डॉ. के. आर. भानुशाली, प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
तद्प्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. बी इ मेकॅनिकल मध्ये प्रथम क्रमांक ऋषिकेश मुंढे,
बी इ इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन मध्ये प्रथम क्रमांक प्रियंका हांडे, बी इ सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये प्रथम क्रमांक विक्रम जोरवार आणि कॉम्प्युटर इंजीनियरिंग मधून अक्षय देवकाते या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. पदवी प्रथम वर्षात प्रथम क्रमांक पंकज जाधव या विद्यार्थ्यांने प्राप्त केला.
डिप्लोमा मध्ये प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये वेदांत जितेंद्र दिवेकर यांनी प्रथम क्रमांक विशेष प्राविण्यसह मिळविला.डिप्लोमा शेवटच्या वर्षा मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग मध्ये प्रथम क्रमांक अबोली पावशे तर मेकॅनिकल मध्ये प्रथम क्रमांक संदीप ठोंबरे याने मिळवला.
वरील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिंकलेल्या संघाना व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्नेहसंमेलनातर्गत इनडोअर व आउटडोअर विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये क्रिकेट, कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ बँटमिंटन इत्यादि. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये नृत्य, कला, नाटक, फॅशन शो, इत्यादी. कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली. सहा दिवस चाललेल्या या जल्लोष कार्यक्रमांनी प्रा.रांधवन भागवत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चांगलीच उंची गाठली.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहुन पालक तसेच आलेले प्रमुख पाहुणे यांनी उत्स्फूर्त दाद दिली व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. तर परीक्षक म्हणून ग्रंथपाल उद्धव भारती, प्रा. प्रतीक्षा सोनवणे प्रा. पंधे, यांनी परिक्षण केले.
तत्पूर्वी संस्थेचे उप अध्यक्ष किशोर पटेल, सेक्रेटरी गणपत कोरडे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, संचालक नागेश आस्पात डॉ. के. आर. भानुशाली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय झोपे यांनी सर्व पालकांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनया वाघुले व वेदिका शिंदे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य पी. बालारामडू यांनी मानले. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार, अमोल पन्हाळकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.