छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कामगिरी
1 min read
रायपूर दि.२०:- छत्तीसगडमधील बिजापूर आणि दंतेवाडात सुरक्षा दलाने मोठे ऑपरेशन सुरु केले आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची कंबर तोडली आहे. दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलास घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा मिळाला आहे.
40 ते 45 नक्षलवाद्यांना जवानांनी घेरले होते. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने नक्षलीविरोधात मोठे मोहीम सुरु केली. सुरक्षा दलाच्या टीमने विजापूर आणि दंतेवाडाच्या गंगालूर भागात ऑपरेशन सुरु केले. यावेळी नक्षली आणि सुरक्षा दलात चकमक सुरु झाली. दोन ऑपरेशनमध्ये 22 नक्षली ठार झाले आहे. सुरक्षा दलाने विजापूरमध्ये 18 तर कांकेरमध्ये 4 नक्षलींना ठार केले. या चकमकीत एक जवान शहीद झाला. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली. या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले.
त्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक जवानही शहीद झाला आहे. गेल्या महिन्यात विजापूर परिसरातही ऑपरेशन राबवण्यात आले होते.विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी मारले गेले होते. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एके ४७, एसएलआर सारख्या मोठ्या ऑटोमॅटिक रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
नक्षलवादी कमांडर पापा राव या भागात सक्रिय आहेत. नक्षलवाद्यांची पश्चिम बस्तर विभागीय समिती सक्रिय होती. मात्र, या परिसराला नक्षलवाद्यांचे विद्यापीठ म्हटले जाते. कांकेर-नारायणपूर सीमा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच.
संयुक्त पोलीस दलाने शोध सुरु केला. या मोहिमेसाठी सुरक्षादले रवाना केली. कांकेर-नारायणपूर सीमा भागात डीआरजी, बीएसएफच्या टीमसोबत नक्षलवाद्यांची चकमक सुरू आहे.