विघ्नहर कारखान्याचे ५४.०९ टक्के मतदान; आज निकाल
1 min readओझर दि.१६:- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक २०२५-२०३० या कालावधीसाठी शनिवारी (दि. १५) निवडणुकीत प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण १९६२७ मतांपैकी १०६७० मतदान होऊन मतदानाची टक्केवारी ५४.०९ असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शिरोली बुद्रुक गटातील ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील ३ जागांसाठी ४ उमेदवार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
शिरोली बुद्रुक ऊस उत्पादक शेतकरी गटामधून ३ जागांसाठी ४ उमेदवार असून यामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलमधून कपबशी या चिन्हावर ते स्वतः, संतोष खैरे,
सुधीर खोकराळे हे उभे आहेत तर त्यांच्या विरोधात रहेमान अब्बास मोमीन इनामदार हे आहेत तर इतर मागास प्रवर्ग या गटातून सुरेश गडगे यांच्या विरोधातही रहेमान अब्बास मोमीन इनामदार यांच्यासह निलेश भुजबळ अशी लढत आहे.
रविवारी (दि. १६) मतमोजणी प्रक्रिया शिरोली बुद्रुक कृषी सेवासह सोसायटी या ठिकाणी ९ ते १२ यावेळेत पार पडणार आहे.