तहसीलदार सुनील शेळके यांनी बोरीतील वहिवाटीचे सहा रस्ते केले खुले
1 min read
बेल्हे दि.१३:- बोरी बु स्मार्ट व्हिलेज मोजणी प्रकल्प तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिव, पानांद रस्ते या बाबतच्या शासकीय निर्णय नुसार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेशानुसार प्रांत शिंदे, तहसीलदार सुनील शेळके यांच्यामार्गदर्शना खाली बोरी बु गावातील पाणंद, शिव रस्ते तयार करण्यासाठी तंटामुक्ती समिती अध्यक्ष युवराज कोरडे यांनी वहिवाटीचे ६ रस्ते खुले केले. तसेच शेतजमिन मोजणी झाल्यामुळे मोजणी समितीचे अध्यक्ष रंजन जाधव यांच्या मार्गदर्शनाने पानंद रस्ते ही मिळण्यास मदत झाली.तसेच बोरी बु गावातील शेतजमिन मोजणी झाल्याने शेतकऱ्यांनी आपआपल्या हद्दी प्रमाणे शेतीची वहिवाट चालू केली.
त्यातील एक आदर्श उदाहरण म्हणजे विलास जाधव यांनी आपली कांद्याची बराखी शेजारील हद्दी असताना मोजणी झाल्यानंतर स्व:खर्च रू ४०,००० करुन आपल्या हद्दी प्रमाणे करुन घेतली. मोजणी झाल्यानंतर रस्त्याचे तसेच बांधाच्या हद्दीचे वादसंपुष्टात येण्यास मदत झाली.
व वहिवाटीचे रस्ते खुले होण्यास मदत झाली. ऊस परिसर मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रतेक शेतकऱ्यांना रस्त्याची गरज महत्वाची आहे. त्यामुळे शेतजमिन मोजणी करुन हे प्रश्न मार्गी लागले.
चौकट
[यामध्ये खालील वहिवाटीचे ६ रस्ते खुले केले
१) बोरी बु गणाचा मळा धोंडजी बाबा मंदिर ते चिंचेची विहिर रस्ता २) बोरी बु ज्ञानेश्वर नगर ग्रामा ३५० ते पश्चिम कडे बनशी कोरडे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता ३) बोरी बु ज्ञानेश्वर नगर ग्रामा ३५० ते पूर्वेला ज्ञानेश्वर नगर ओढ्याकडे जाणारा रस्ता ४) बोरी बु प्रजिमा ८ जानबाबा ते जुना साकुरी मार्ग रस्ता५) बोरी बु साई नगर ओढा ते साईनगर कॅनोल रस्ता ६) बोरी बु प्रजिमा २१ ते पडेकर वस्ती रस्ता( ह्या रस्त्याची मोजणी नंतर मोजणी नुसार हद्द बदलली]या वेळी तहसीलदार सुनील शेळके, तलाठी वाळूंज, जावेद मणियार, गमोजणी समिती अध्यक्ष रंजन जाधव, लक्ष्मण कोरडे,
वामन कोरडे, राऊजी कोरडे, विश्वनाथ थोरात, तुळशीराम जाधव, बाळासाहेब कोरडे, दिलीप कुटे, अमोल खिल्लारी, राजेंद्र जाधव, राजेंद्र कोरडे, शांताराम कोरडे, माऊली कोरडे, अशोक पाडेकर, दत्तात्रय जाधव, संतोष औटी, सूरज पाडेकर, रत्नदीप जाधव, निलेश जाधव, प्रभाकर कोरडे, भारत कोरडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्यांच्या समस्या वारंवार शेतमाल काढताना तसेच रोजची जा ये करण्यासाठी तसेच पावसाळ्या मधे मोटारसायकल अथवा चारचाकी वाहनाना त्रास होत होता परंतु मोजणी मुळे आणि झालेल्या रस्त्यामुळे हा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली.
ऊस पिक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळ शेतात वाहने जाण्यास ह्या रस्त्यांची मदत झाली तसेच मोजणी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा बांधावरुणचा आपआपसातील वाद मिटण्यास मदत झाली. येथे एकूण १७७७ गट असून १६०० गटांची हद्द कायम झालेली आहे.
तसेच शेतकऱ्यांनी मोजणी हद्दी नुसार शेतातील माल निघाल्यानंतर ताबा देण्यास सुरुवात केली आहे.तसेच बागायती गाव असल्या कारणाने शेतकर्यांना मालाची वाहतूक तसेच शेतीची आवजारे शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी रस्त्यांची जी गरज आहे.
ती या मोजणी च्या माध्यमातूम सुटली, धारण क्षेत्र जसजसे कमी होत चलाल आहे आहे तशा रस्त्यांच्या आडचणी वाढत चालल्या आहे. मोजणी मुळे हे आडचणीतील रस्ते करणे सोईस्कर झाले.
——-
प्रतिक्रिया
“जुन्नर तालुक्यामध्ये २५०-२७५ केसेस ह्या रस्त्यानंसंधर्भातील आहे,परंतु बोरी बु गावातील शेतकऱ्यांनी मोजणी नंतर स्वतःहून बाकी आतील शेतकऱ्यांची आडचण समजून रस्ते मोकळे केले ही प्रशासनाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, तसेच स्मार्ट व्हिलेज मोजणी नंतर रस्ते होताते हा आपल्या तालुक्यासाठी पथदर्श म्हणून हे गाव ठरणार आहे.”
सुनील शेळके, तहसीलदार जुन्नर