बल्लाळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात ७ शेळ्यांचा मृत्यू

1 min read

जुन्नर दि.१२:- जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि. १०) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ७ शेळ्यांचा मृत्यू झाला.ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.बल्लाळवाडी येथे सुधीर घोलप हे शेळीपालन करतात. त्यांचा गोठा असून, त्यात पंजाब बिटल जातीच्या १५ शेळ्या, १ बोकड व ३ बकऱ्या आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी १२ फूट जाळीचे तारेचे कुंपण केले आहे. या कुंपणावरून उडी मारून बिबट्याने आतमध्ये प्रवेश केला आणि ७ शेळ्यांवर हल्ला केला. यामध्ये त्या शेळ्यांचा मृत्यू झाला.पहाटे २ वाजल्यानंतर तीनवेळा बिबट्या गोठ्यात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. हा एकच बिबट्या आहे की वेगवेगळे आहेत, याबाबतची नेमकी माहिती समजू शकली नाही. गोठ्याच्या मागील बाजूने असलेल्या जाळीच्या कुंपणावरून उड्या मारून बिबट्या पसार झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १०) सकाळी शेळ्यांना चारा खायला घालण्यासाठी गेले असता घोलप यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वन विभागाला याबाबत कळविले. वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यापूर्वी ११ नोव्हेंबर २०२० रोजी बिबट्याच्या हल्ल्यात २ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे