मंचर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; आवक वाढल्याने भाव गडगडले
1 min read
मंचर दि.१०:- आवक वाढल्याने मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. रविवारी दहा किलो कांदा १७० रुपये या भावाने विकला गेला, अशी माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली.मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला रविवारी १० किलोला १७० रुपये, असा बाजारभाव मिळाला. ३५ हजार पिशवी कांद्याची आवक होवून चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला १७० रुपये या भावाने विकला गेला आहे. मंचर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत.
कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे: सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा रुपये १५० ते १७० रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १३० ते १५० रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास ११० ते १३० रुपये, गोल्टी कांद्यास ९० ते ११० रुपये, बदला कांद्यास ५० ते ८० रुपये असा बाजारभाव मिळाला.