श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ पैकी १७ जागेवर संचलकांची बिनविरोध निवड; चार जागेसाठी सात उमेदवार रिंगणात
1 min read
आळेफाटा दि.७:- पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या निवृत्तीनगर, धालेवाडी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी नंतर संचालकांच्या २१ पैकी चार जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.संचालक मंडळाच्या निवडणुकीमधील शिरोली बुद्रुक गटातील उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील तीन जागांसाठी चार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आज ता.५ रोजी निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.मतदान शनिवार ता. १५ मार्च रोजी सकाळी ८ ते ५ वेळेत होणार असून मतमोजणी रविवार ता. १६ रोजी होईल असे शिंदे यांनी सांगितले.
शिरोली बुद्रुक गटातील उमेदवार पुढीलप्रमाणे – विद्यमान अध्यक्ष सत्यशील सोपानशेठ शेरकर, रहेमान आब्बास मोमीन इनामदार, संतोषनाना बबन खैरे व सुधीर महादू खोकराळे .इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातील उमेदवार – सुरेश भिमाजी गडगे,
निलेश नामदेव भुजबळ व रहेमान आब्बास मोमीन इनामदार अन्य मतदार संघातील बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे –ओतूर गट (चार जागा) – धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर. पिंपळवंडी गट (तीन जागा) – विवेक काकडे, विलास दांगट, प्रकाश जाधव.
उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघ जुन्नर गट (तीन जागा) -अशोक घोलप, अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी, घोडेगाव गट (तीन जागा) यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ (एक जागा)- प्रकाश सरोगदे , भटक्या जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) -संजय खेडकर.
दरम्यान विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्यासह संतोषनाना खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, देवेंद्र खिलारी, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे,पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी आहे.
माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संचालकपदाची संधी मिळाली आहे. तर अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे हे नवीन चेहरे आहेत.
कारखान्याची निवडणूक जरी लागली असली तरी विद्यमान अध्यक्ष सत्याशील शेरकर यांचीच निर्विवाद सत्ता येणार असल्याचे बोलले जात आहे. शिरोली बुद्रुक गट व इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील निवडणूकीची औपचारिकता बाकी आहे. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी माघार घेतली असल्याचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद खांडगे व योगेश तोडकर यांनी सांगितले.