जुन्नर तालुक्यात डोंगरांवर अज्ञातांकडून वणवा
1 min read
आणे दि.९:- जुन्नर तालुक्यातील आळे, राजुरी, उंचखडक, बांगरवाडी येथील स्थानिक लोकांच्या मालकीचे डोंगर व वनविभागाचे काही भाग अज्ञात व्यक्तीकडून पेटवून द्यायचा घटना या पाच-दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.बांगरवाडीतील बांधूडा, धावडबांध, दावलमालिक डोंगर, तळयांचे कुरण असे सर्व डोंगर काही समाज कंटक एक एक करून दोन दोन दिवसाच्या फरकाने पेटून देत आहे. या गोष्टी कडे गांभीर्याने पाहत नसल्याने व कारवाई होत नसल्याने डोंगर पेटून देण्याच्या घटना वारंवार वाढत आहेत.
त्यात स्थानिक लोकांना व वन्य प्राण्यांना मोठया प्रमाणात झळ पोहचत आहे. आगी मुळे वन्य जीवांचे अन्नाचे हाल होत आहे. झाडे, झुडुपे जळून जात आहेत. आगीमुळे प्राण्यांना निवारा राहत नाही. वन्यजीव मानवी वस्तीला आश्रयाला येत आहे.
त्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना होत असून मुक्या प्राण्यानाही होत आहे. लहान झाडें अगीच्या विळख्यात आल्यामुळे त्यांचीही मोठी हानी निर्माण झाली आहे. या वर ठोस उपाय योजना होणे गरजेचे असून दरवर्षी या समस्या निर्माण होत आहे.
प्रतिक्रिया
“वन विभागाने असे कृत्य कारणांवर कडक कारवाई करावी. तसेच वनविभागातील जाळ पट्टे वेळेत काढले तर आग अधीकच भडकनार नाहीत.”
महेंद्र बांगर
ग्रामस्थ बांगरवाडी