अध्ययन अध्यापनात डिजिटल साहित्याचे महत्त्व:- संतोष डुकरे
1 min read
जुन्नर दि.८:- संगणक हा, संगणक हा, मित्र आमचा नवा जेथे तेथे ज्याला त्याला सदोदित तो हवा,कवी अविनाश ओगले यांच्या या उक्तीप्रमाणे एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना संगणक हा सर्वांचा मित्र झालेला दिसून येतो. ई – क्रांती घडत असताना केवळ संगणकच नव्हे. तर अशी अनेक डिजिटल साधने तुम्हा आम्हा सर्वांचे मित्र झालेले आहेत यामध्ये मोबाईल फोन स्मार्ट बोर्ड, टॅब ,इंटरनेट, युट्युब असेल एआय टेक्नॉलॉजी ,कोडींग तंत्रज्ञान हे सर्वच गोष्टी आपले मित्र आहेत.1 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया मिशन लॉन्च केली.
आणि आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रमांचा समावेश केला आहे.खरं तर डिजिटल शिक्षणाची प्रभावी सुरुवात कोरोना काळात झाली.
त्याचं महत्त्व सुद्धा या काळामध्ये लक्षात आलं. संपूर्ण जग जेव्हा बंद घरात कोंडलं गेलं तेव्हा शिक्षणात द्यायचं कसं हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा डिजिटल साधने एक महत्वाचे माध्यम म्हणून समोर आली. नव्हे नव्हे तर आपले शैक्षणिक गुरु सुद्धा ते होऊ पाहत आहेत ही गोष्ट आपण ना करू शकत नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम करत असताना व डिजिटल साहित्याचा वापर करत असताना त्याचा होणारा उपयोग मला या ठिकाणी आपणासमोर नक्की नमूद करावे वाटते. एकविसाव्या शतकातील विद्यार्थी हा डिजिटल साक्षार झाला पाहिजे.
यासाठी शिक्षकाला सुद्धांचा अध्यापन करत असताना या डिजीटल साधांनाचा उपयोग करावा लागत आहे.अमेरिकन शिक्षक एडगर डेल यांनी एक अनुभव शंकू विकसित केला होता. त्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष अनुभव हा त्या शंकूचा पाया होता.आणि या डिजिटल साधनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाची संधी शिक्षक उपलब्ध करून देऊ शकतो.
विज्ञान युगात डिजिटल साधनांचे महत्त्व नाकारता येणार नाही डिजिटल साहित्य हा विद्यार्थ्यांचा दुसरा गुरु आहे. पहिला गुरु आई आहे परंतु आज मुलांना समजायला लागल्यावर त्याच्या हातामध्ये मोबाईल हा त्याचा दुसरा गुरू झाला आहे.जर शिक्षकाला आनंददायी पद्धतीने शिक्षण द्यायचा असेल, प्रत्यक्ष कृतीला वाव देउन शिक्षण द्यायचे असेल,
त्याचबरोबर दप्तराचं ओझं हलकं करून विद्यार्थ्यांना जर शिक्षण द्यायचं असेल तर नक्कीच डिजिटल साधन त्यासाठी महत्वाची असणार आहेत. शिक्षक पालक विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेतील एक त्रिकोण समजला जातो आणि या त्रिकोणा मधील तिघांनाही या डिजिटल शिक्षणाचा उपयोग अध्यापनात होत आहे.वापर करण्यास हाताळण्यास सुलभ असणारी ही डिजिटल साधने म्हणजे शिक्षकाचा खरा मित्र आहेत.
1)संगणक –
संगणका संगणकाचा शोध लागून खूप वर्ष झाले सुरुवातीला याचा वापर युद्ध असेल किंवा इतर गोष्टीसाठी सीमित होता परंतु आज संपूर्ण जग या संगणकाने व्यापला आहे मग शिक्षणक्षेत्र तरी या संगणकापासून कसे वंचित राहील डॉ. विजय भटकर असे म्हणतात की, चिमुकल्यांची बोटे या संगणकावर फिरू लागलं तर खरी डिजिटल क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आज या चिमुकल्यांचे हात संगणकावर फिरू लागले आहे त.संगणक त्यांचा मित्र झालेला आहे आणि हा शिक्षकांचा सुद्धा मित्र आहे , कारण पावर पॉइंट, वर्ड ,एक्सेल इत्यादी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो ,पीपीटी तयार करू शकतो जे मुलांना अध्ययन अध्यापन करण्यास सुलभता होते.
इंटरनेटच्या मदतीने एका क्लिकवर आपण पाहिजे ती गोष्ट पाहिजे ती गोष्ट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवू शकतो. संगणकावर आज खान अकॅडमी वेबसाईटच्या माध्यमातून गणित विषयासाठी प्लॅटफॉर्म मूलांना उपलब्ध करून दिलेला आहे.
यामुळे गणित विषयांमधील संख्याज्ञान संख्या व त्यावरील क्रिया करणे यासाठी उदाहरणे खान अकॅडमी वेबसाईटच्या माध्यमातून संगणकावर विद्यार्थी शिकत आहेत. पेंट चा उपयोग करुन चित्र काढणे असेल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विद्यार्थी संगणकावर करत आहे.
2)इंटरनेट –
संगणकाच्या जोडीला इंटरनेट आले आहे.मित्रांनो 24 *7 तास उपलब्ध असणार शैक्षणिक साधन जर कोणते असेल तर ते आहे इंटरनेट ,आणि या इंटरनेटच्या माध्यमातूनच जगातील अनेक विषयांची माहिती आपण एका क्लिकवर शोधू शकतो अध्ययन अध्यापन करत असताना आपल्याला वेळोवेळी अनेक प्रकारच्या दृश्य माहितीची आवश्यकता असते. उदाहरणार्थ जर आपल्याला हिमालयाची माहिती सांगायची असेल तर एका क्लिकवर आपण हिमालयाचे चित्र विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवू शकतो एकदा प्राणी दाखवायचा असेल पाळीव प्राणी जंगली प्राणी दाखवायचा असेल तर आपण एका क्लिक करतो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्याचा प्रभावी उपयोग आपण अध्यापनात करू शकतो.
3)मोबाईल /टॅब-
आताच्या काळातीक मुलांच्या जवळील मित्र कोण झाला असेल तर तो मोबाईल झाला आहे.मोबाईल चा प्रमुख उपयोग म्हणजे इंटरनेट च्या मदतीने zoom ,google meet च्या माध्यमातून अध्यापन करून अधिकचे मार्गदर्शन करता येते. शिक्षकांना अध्यापन करत असताना विविध प्रकारच्या शैक्षणिक ऍप च्या मदतीने आनंददायी पद्धतीने स्वाध्याय सोडविता येतात. विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने अध्यापन करता येते. सोबत कवितेच्या चाली , पाढे पाठांतर ,अशा या अनेक बाबी मोबाईलचा वापर करून अध्यापन करता येतात. अनेक ऑनलाईन लिंक तयार करून शिक्षक मुलांना अध्यापन करू शकतात.whats app चा उपयोग पालक व विद्यार्थी संपर्क करणे .Pinarest सारखे अँप च्या माध्यमातून स्वाध्याय देणे. विविध डिजिटल खेळा तुन ज्ञानाचे दृढीकरण करता येते.
4)यूट्यूब-
युट्युब हे सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांचे मित्र बनलेले आहेत.अध्यापन करत असताना अनेक कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगता येते. सर्वच विषयांच्या अध्यापनात हे प्रभावी साधन आहे. . भाषा विषयातील विविध कथा,पाठ कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून देता येतात. केवळ शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थी शिकतो असे नाही तर, विद्यार्थी हा स्वतः सुद्धा शिकत असतो. तो कायम ज्ञानाचा भुकेलेला असतो आणि हा विद्यार्थी घरी यु ट्यूब च्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यावर सर्च करून शिकत असतो. अगदी विद्यार्थी स्वतःहून सुद्धा अनेक गोष्टींची माहिती या यु ट्यूबच्या माध्यमातून आज घेत आहे. पालक सुद्धा याचा प्रभावी वापर आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करत आहेत त्यामुळे यु ट्यूब चे महत्व आपण नाकारू शकत नाही.
5)कोडींग तंत्रज्ञान-
माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानव अनेक वेगवेगळ्या भाषेत शिकू लागलेला आहे.या भाषेच्या माध्यमातून तो संगणकाशी संवाद साधू लागलेला आहे.अशाच प्रकारे संगणक आणि मानव यांच्यामध्ये संवाद साधणारी भाषा असते त्याला म्हणतात कोडिंग.या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी वाढीस लागण्यासाठी कोडींग फायदेशीर होत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोय.भविष्यातील करिअरसाठी विद्यार्थी सशक्त होत आहे.समस्या सोडवण्यासाठी अनेक मार्ग असतात यामध्ये डी कंपोझिशन ,अलगोरिदम पॅटर्न ,यामधून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव दिला जातो आणि हा प्लॅटफॉर्म सध्या शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे संगणकावर स्क्रॅप असेल.
किंवा मोबाईलवर पिक्टुबॉक्स ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी कोणी शिकू लागलेले आहे. यामुळे शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थी या ठिकाणी आपली कौशल्य विकसित करू शकतो लागली आहेत.नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 4 C सांगितलेले आहेत. ज्यामध्ये कम्युनिकेशन,क्रिएटिव्हिटी , क्रिटिकल थिंकिंग कोलाब्रेशन हे कोडींगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विकसित करण्याचा कोडिंग हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.
भाषासारख्या विषयांमध्ये अनेक कृतींचा क्रम लावून त्याचे अचूक मांडणी करणे तसेच इतिहासासारख्या विषयांमध्ये घटनाक्रम लावले गणितासारख्या विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून उदाहरणे सोडविणे अशा अनेक कृतींचा उपयोग कोडींग च्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतोय आणि त्याच्यामधून त्याचा तंत्रज्ञान तो आत्मसात करतोय.
6)डिजिटल स्मार्ट बोर्ड
डिजिटल स्मार्ट बोर्ड नव्यानेच येणारा शिक्षकाचा मित्र आहे सुरुवातीला फळा हा शिक्षकाचा मित्र होता परंतु आज नवीन शिक्षकाचा मित्र तयार झाला आहे तो म्हणजे, डिजिटल स्मार्ट बोर्ड च्या माध्यमातून विद्यार्थी व डिजिटल बोर्ड ही एक आंतरक्रिया होऊ लागली. यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीला संधी असते आणि विद्यार्थी पेनच्या साह्याने डिजिटल बोर्डवर वेगवेगळे आकार रेखाटतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्याय स्वतः सोडवतो .त्यामुळे अनावश्यक असणारा वेळ शिक्षकांचा वाचत असतो पण प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप अनेक यासारखे सरावसंच इथे सोडवता येतात. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी डिजिटल बोर्ड अनेक प्रकारचे स्वाध्याय मुलांना सोडवण्यासाठी वाव असतो.
विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने डिजीटल बोर्डवर आनंदायी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी आणि शैक्षणिक साहित्य ही आंतरक्रिया एकदम प्रभावी होते .पाहिले अमेरिकन नागरिक म्हणून गौरविल्या बेंजामिन फ्रँकलिन यांचे शिकण्याविषयी छानसं वाक्य म्हटले आहे.I listen, I recall, I see i understand , I do I perform या वाक्यनुसार प्रत्यक्ष कृती करण्याची संधी या डिजिटल इंटरॅक्टिव बोटच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना देत आहे.
त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या प्रतिमा असतील विद्यार्थ्यांनी गिरवलेली बोट असतील त्यांनी काढलेले आकार त्यांच्या मनामध्ये अगदी साठवले जातात आणि ते स्मरणात राहतात त्यामुळे डिजिटल बोर्ड हा खऱ्या अर्थाने शिक्षक व विद्यार्थी यांचा मित्र आहे.
7)AI तंत्रज्ञान-
अध्ययनाने अध्यापनात शिक्षणातAI तंत्रज्ञांचा वापर केल्याने शिकवण्याच्या शिकवण्याच्या तंत्रात कायापालट होत आहे आणि शिकवण्याची शैली बदलली. स्वित्झरलँड चे मानसोपचार तज्ञ कार्ल गुस्ताव जंग यांनी म्हटले आहे की, एका आकाराची चप्पल दुसऱ्या व्यक्तीला फिट होऊ शकत नाही तशी आयुष्याची एक गोष्ट सर्वांना लागू शकत नाही व्यक्ती परत्वे शिक्षणाची कवडे खुली झाली आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे सामर्थ्य दुर्बलांना अध्यायातील गती याचा विचार करून शिक्षण देता येईल विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांत तो विषय त्याला समजला आहे किंवा नाही याची माहिती लगेच मिळेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यक्ती असेल आणि या सगळ्यांना एक आधार असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे एकाच वेळी अनेक विद्यार्थी शिकू शकतात.
किंवा अनेक शिक्षकांची मार्गदर्शन एक एकच विद्यार्थी घेऊ शकतो आर्टिफिशल घेण्याच्या माध्यमातून आभासी वर्ग खोली असेल त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना अनेक प्राणी पक्षी त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या प्राणी पक्षी यांची आभासी चित्र तयार करून दाखवू शकतो.
8)स्मार्ट TV
स्मार्ट टीव्ही च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देऊ शकतो.वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आपण या टीव्हीमध्ये समाविष्ट करून विद्यार्थ्यांना विविध वर्गांचा अभ्यास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. संपर्क फाउंडेशन चैतन्य सॉफ्टवेअर असे अनेक सॉफ्टवेअर आपण या टीव्हीमध्ये डाऊनलोड करून. विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पाठ चित्रासह यामध्ये स्पष्ट केलेले असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये अध्ययन अध्यापन करू शकतात शिक्षक वर्गामध्ये उपलब्ध नसतानाही विद्यार्थी याचा उपयोग करून स्वावलंबी शिक्षण घेत असतात.
9) ई लायब्ररी-
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे यासाठी बुक गंगा सारख्या अनेक गोष्टींनी वेबसाईटवर विविध पुस्तके डिजिटल पध्दतीने उपलब्ध करून दिला आहेत.अशा पद्धतीने शिक्षक सर्व विषयांचे अध्यापन करत असताना डिजिटल साधनांचा अगदी प्रभावीपणे वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करू शकतो . डिजिटल साधनांचा आपण उपयोग शारीरिक शिक्षण सारख्या विषयांमध्ये सुद्धा आपल्याला करता येतो.अनेक खेळांची माहिती खेळाडू त्या खेळाबद्दल सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून शिक्षक मुलांना माहिती देतात.कवायती योगासने, कलेचे प्रकार चित्रकला, कार्यानुभव ,मधील विविध कृती यासाठी सुद्धा प्रभावीपणे आपल्याला मोबाईलचा वापर करता येतो.विज्ञान विषयाचे तर डिजिटल तंत्रज्ञानाशिवाय अध्यापन अशक्य झालेले आहे .शरीराची अंतरइंद्रिये , पृथ्वीच्या अंतर्गत रचना, सूर्यमाला अशा घटकांचे वास्तवतेचे दर्शन शिक्षक विद्यार्थ्यांना या डिजिटल साधनांच्या माध्यमातून घडवू शकतात.
त्याचबरोबर ऐतिहासिक गड किल्ले परिसरातील महत्त्वपूर्ण गोष्टी या सगळ्या शिक्षक साधनांच्या माध्यमातून मुलांना स्पष्ट करू शकतात. इंग्रजीच्या कविता,चित्रमय, गोष्टी अल्फाबेट, गणित सारख्या विषयांमध्ये संख्या संख्यावरील क्रिया याच्या अनेक ची उदाहरणे भाषा कवितेच्या चाली ,गोष्टी या सगळ्या गोष्टी डिजिटल साधनांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात.
परंतु हे सगळं करत असताना नाण्याची दुसरी बाजू पाहिली पाहिजे या सर्व डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षक हा तर खऱ्या अर्थाने सुलभक बनतो पण विद्यार्थ्यांकडून मोबाईल सारख्या डिजिटल साधनांचा अति वापर झाल्याने नैराश्य येणे, एकटे पडणे, डोळ्यांचे विकार त्याने समस्या उद्भवू शकतात सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणे ही घातक झालेले आहे.
आणि आत्ताची पिढी सोशल मीडियाच्या आहारी जाताना दिसत आहे. या ठिकाणी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. योग्य वेळी योग्य साहित्य वापरल्यास त्याचे फायदेच खूप आहेत.राजहंस ज्याप्रमाणे दुधातील पाणी वेगळे करतो.
त्याप्रमाणे शिक्षकांनी याच्यातील काही बाबी दुर्लक्षित करून चांगला वापर केल्यास ही डिजिटल साधने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी नक्कीच एक सोबती म्हणून चांगले काम करील यामध्ये कुठली शंका नाही.
शब्दांकन:- संतोष हरिभाऊ डुकरे
उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर-१ ता जुन्नर, जिल्हा.पुणे