जुन्नर तालुका बिबट मुक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वनवास आंदोलन

1 min read

जुन्नर दि.८:- आकाश मिननाथ चव्हाण व त्याच्या कुटुंबावर बिबट्याने दि.६ रोजी रात्री २ वाजता घरात घुसून हल्ला केला स्वसंरक्षणासाठी ह्या कुटुंबाने बिबट्याबरोबर मोठ्या धाडसाने झुंज दिली. त्यामध्ये आकाश याने काठी घेऊन बिबट्याला पळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आकाशच्या दोन्ही हातांचा बिबट्याने चावा घेतला त्याला व गंभीर जखमी केले त्यामध्ये त्याची आई व पत्नी यांच्यावर देखील बिबट्या हल्ला करणार त्यातच ह्या दोन्ही महिला आसऱ्यासाठी शेजारी घरामध्ये रात्री दोन वाजता गेल्या.एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील वनविभागाच्या अधिकारी गम गांभीर्यपूर्वक दखल घेत नाही काही अधिकाऱ्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ आहे. त्यामुळे सदर कुटुंबाला वनविभागाकडून संरक्षण मिळावे व कुटुंबावर हल्ला केल्यामुळे कुटुंबाला पंचवीस लाख रुपये वन विभागाने द्यावेत. म्हणून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शनिवार दिनांक ०८ सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत वनवास आंदोलन करत आहोत याची दखल जर वन विभागाने घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन वडज धरणाच्या भिंतीवर बसून वनवास आंदोलन करण्यात येईल याची देखील शासनाने व वन विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी.जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत असताना देखील शासन व वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे प्रमोद खांडगे पाटील प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुका व योगेशभाऊ तोडकर जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी सेना हे वडज या ठिकाणी वनवास आंदोलन करणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे