मागण्या मान्य झाल्याने वनवास आंदोलन स्थगित

1 min read

जुन्नर दि.१०:- वडज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे शेतकरी सेना यांनी वनवास आंदोलन केले शिवजन्मभूमीचे आमदार शरद सोनवणे व वन विभाग जुन्नर यांनी मागणी मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.दिनांक ०६ रोजी रात्री दोन वाजता आकाश मिननाथ चव्हाण व त्याच्या कुटुंबावर बिबट्याने घरात घुसून हल्ला केला स्वसंरक्षणासाठी ह्या कुटुंबाने बिबट्याबरोबर मोठ्या धाडसाने झुंज दिली. त्यामध्ये आकाश याने काठी घेऊन बिबट्याला पळून लावण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये आकाशच्या दोन्ही हातांचा बिबट्याने चावा घेतला त्याला व गंभीर जखमी केले त्यामध्ये त्याची आई व पत्नी यांच्यावर देखील बिबट्या हल्ला करणार त्यातच ह्या दोन्ही महिला आसऱ्यासाठी शेजारी घरामध्ये रात्री दोन वाजता गेल्या. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शनिवार दिनांक ०८ पासून प्रमोद खांडगे पाटील प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर योगेशभाऊ तोडकर अध्यक्ष मनसे शेतकरी सेना पुणे यांनी आकाश मीननाथ चव्हाण व त्याच्या कुटुंबाला सोबत घेऊन वनवास आंदोलन सुरू केले होते.आंदोलनाची दखल घेऊन शिवजन्मभूमीचे आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली आंदोलन स्थळी मागण्या मान्य केल्या. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसे शेतकरी सेना यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलन स्थळी वडज गावचे सरपंच सुनील चव्हाण व ग्रामस्थ, वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर प्रदीप चव्हाण, सहाय्यक वन संरक्षक राजहंस वन परिमंडळ अधिकारी नितीन विधाटे जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर गोपनीय विभागाचे अधिकारी लोकरे वन विभाग जुन्नर व शिवजन्ममीचे आमदार शरद सोनवणे यांनी मान्य केलेल्या मागण्या चव्हाण कुटुंबाला वन विभागाकडून मदत मिळावी तसेच हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी देखील भोर या जेष्ठ शेतकऱ्यावर बिबटणे हल्ला केला त्यांना देखील मदत मिळावी.जुन्नर तालुका बिबट मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसे शेतकरी सेना यांची बैठक लावावी. चव्हाण कुटुंबाला शासनाकडून राहण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात यावे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते आठ तास थ्री फेज दिवसा लाईट देऊ त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे