खोक्याभाईने मारलेल्या हरणाचं मटण सुरेश धसांना जायचं…” मुंडेंचा खळबळजनक आरोप
1 min read
बीड दि.८:- बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्याभाईने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश दादांना पोहोचते केले जाते म्हणून सतीश भोसलेवर गुन्हे दाखल होत नाहीत. सतीश भोसले हरणाला मारल्यानंतर दोन-चार किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचा. असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याभाईविरुद्ध कारवाईची मागणी करण्यासाठी गावकऱ्यांसह ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं मुंडे म्हणाले.
तसेच,भाजपा आमदार सुरेश धस आणि सतीश भोसलेच्या विरोधात रविवारी शिरूर मध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.त्यामुळे जर अशाप्रकारे सतीश भोसले धसांची सेवा करत असेल तर त्याच्यावरती गुन्हा कसा दाखल होईल.
या गंभीर प्रकरणासंदर्भात मी वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे. पण त्यांच्या बॉसला म्हणजे मुख्यमंत्र्यांची मी विशेष भेट घेणार आहे. असे मुंडे म्हणालेया मुद्द्यावर ते येत्या मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
गावकऱ्यांसह शिष्टमंडळासोबत ही भेट असणार आहे. हरण तस्करीमध्ये सुरेश धस देखील सह आरोपी झाले पाहिजेत. हे दुसऱ्यांना आका म्हणतात. हे तर आकाचे आका आहेत.