मी गृहमंत्री असूनही सीआयडीच्या कामात हस्तक्षेप केला नाही:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.६:- संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एका माध्यमावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी सीआयडीने जेव्हा दोषरोपपत्र दाखल केले, तेव्हाच मला तपासात काय आहे, ते कळले. तोपर्यंत मला याबद्दल माहिती नव्हते. मी गृहमंत्री असूनही सीआयडीच्या कामात हस्तक्षेप केला नाही. जर मीच नि:ष्पक्ष तपास होण्यासाठी आग्रही असेल तर दुसऱ्या कुणाचीही तपासात आडकाठी आणण्याची हिंमतही नव्हती. दोषारोपत्र दाखल झाल्यानंतरच मला ते फोटो पहायला मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे