श्री.जे. आर. गुंजाळ इंग्लिश मेडिअम स्कूलच्या ” टीम निओ न्यूटनियनचा ऐतिहासिक विजय”
1 min read
आळेफाटा दि.४ :- बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या रोबोटिक्स स्पर्धेत श्री. जे. गुंजाळ इंग्लिश मेडिअम स्कूल ने दिमाखदार यश संपादित केले, First Tech Challenge India Championship २०२५ मध्ये भाग घेऊन Judges Choice Award पटकवणारी, जुन्नर तालुक्यातील ही पहिलीच शाळा ठरली आहे.
अवघ्या काही दिवसांत विद्यार्थ्यांनी केलेले कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेने दिलेला पाठिंबा या जोरावर विद्यार्थ्यांनी ही अभूतपूर्व कामगिरी केली. अचूक नियोजन व तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थांनी तयार केलेल्या रोबोटने उपास्थित सर्वांची मने जिंकली.या स्पर्धेमध्ये अमेरिका, श्रीलंका, बांगलादेश, साऊथ कोरीया, नेपाळ अशा विविध देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. यांना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगली टक्कर दिली, तसेच गुजरात, पणजी, गोवा, राजस्थान या राज्यांतील देखील स्पर्धक सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या या ऐतिहासिक विजयाने शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या स्पर्धेत शाळेतील २४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये श्रेयश देवकर, संस्कार शिंदे, प्रदूमण्य जाधव, नयन भुजबळ, वेद ढोकरे, वेदांत दांगट, वैभव मेढा, हर्षद भुजड, प्राची नवले, ऋचा पापळ, निरंका ठाकरे, आकांक्षा सात्वि, सोहम कुटे, आरव भुजबळ, आर्या पोटे, वैष्णवी हांडे, आराध्य हांडे, संकेत कदम, तन्वी फुलसुंदर, श्रुष्टि शिंगोटे, अदिती वांगड, सुप्रेम रिंझाडं, शाम भोणार, रुतिका बीज या विद्यार्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी डॉ.श्रीकांत गुंजाळ व डॉ.सुयश गुंजाळ यांनी विशेष मेहनत घेतली. यानिमीत्ताने ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ, सचिव मीना गुंजाळ, सदस्य आबाजी काळे, प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.