गुजरात राज्यातील गड्डी गॅगला आळेफाटा पोलीसांकडून अटक; ८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त; आळे येथील महिलेचे दागिने केले होते लंपास
1 min read
आळे दि.३:- आळे ता. जुन्नर गावचे हद्दीत चिंचखाई मळा येथे यातील फिर्यादी नामे भागुबाई श्रीपत सहाणे वय ५९ वर्षे हे पायी घरी जात
असताना दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या पाठलाग करून फिर्यादीस मावशी तुम्ही एकटेच आहात त्यामुळे तुमच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र व हाताच्या बोटातील अंगठी ही रूमालात बांधून ठेवा. असे बोलल्याने फिर्यादीने त्यांच्या गळयातील मंगळसुत्र व सोन्याची अंगठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे रूमालात बांधून पिशवीत ठेवली असता, रूमालातील सोन्याचे दागिने हे हातचलाखिने काढून घेवून फिर्यादीची फसवणुक केलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं ६२६/२०२३ भा.द.वि.कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या, त्यानुसार गुन्हे शोध पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा व गुन्हयातील फसवणुक करून चोरून नेलेले सोन्याची दागिने यांचा शोध घेत असताना. अशाप्रकारे वयोवृध्द नागरींकाचे सोन्याचे दागिने चोरी करणारी टोळी गुन्हे करण्यासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली असल्याने सदर माहितीच्या आधारे सापळा रचून अत्यंत शिताफिने सिन्नर टोलनाका येथे त्यांचे ताब्यातील हुदयाई कंपनीची आय २० वाहन कमांक GJ01 KE 2555 यासह आरोपी नामे
१) सुरज हसमुख भाई राजपुत वय २५ वर्षे रा. किजकोळी सर्कल बडोदा, गुजरात, २) राहुल हसमुख भाई राजपुत वय २१ वर्षे रा. किजकोळी सर्कल बडोदा, गुजरात, ३) हरी गंगाराम भावरी राठोड वय ५० वर्षे रा. नोबेल नगर, कोंढीयार नगर जि. अहमदाबाद, गुजरात, ४) बबलु बिरचंद सोलंकी वय २७ वर्षे रा. मोहल्ला सभागृह नागपुर, महाराष्ट्र यांना ताब्यात घेवून.
त्यांच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी सदरचे सोने हे गौरंग चंद्रकांत पटेल रा. महाकाली सोसायटी पादरा ता. पादरा जि. बडोदा, गुजरात या सोनारास विकले असल्याची कबुली दिली असल्याने नमुद सोनारास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली.
असून त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. नमुद अटक आरोपींकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.सदर आरोपींकडुन हुदयाई कंपनीची आय २० वाहन कमांक GJ 01 KE 2555 तसेच ४० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण ८,२०,०००/- रू (आठ लाख विस हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पंकज देशमुख साो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, रविंद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पो.स.ई विनोद धुर्वे, सहा. फौजदार राजेंद्र हिले, चंद्रा डुंबरे, पो. हवा सुनिल गिरी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, आमित पोळ, पो.कॉ नविन अरगडे, शैलेश वाघमारे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.