सतीश (खोक्या) भोसलेवर शिकारीचा आरोप; वनविभागाचा पंचनामा

1 min read

बीड दि.९:- भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या सतीश भोसलेचे एक एक कारनामे समोर येत आहेत. सतीशला शिकारीचा शौक होता. त्याने परिसरातील हरणांची शिकार त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पाटोदा येथील वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पथकाला येथे मृत प्राण्याचे सांगाडे सापडले. हे सांगाडे हरिण आणि काळविटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

यानंतर आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याची माहिती आहे. सतीश भोसलेला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. खोक्याने आतापर्यंत साधारण २०० पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचे आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात. याशिवाय डोंगरात पक्षी पकडण्याचे जाळे लावून कित्येक मोरही खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हरणांना मारुन खाण्यात आले त्याठिकाणी जाऊन वनविभागाने पंचनामा केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे