समर्थ पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा संपन्न
1 min read
बेल्हे दि.२२:- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट,राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच ९ व्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके यांच्या शुभेच्छा हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यातील विविध विद्यालयातील सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग नोंदवला.सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यानी नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी व प्रत्येक वेळी आपल्यामधील उणिवा दुर करून परिपूर्ण बनावे असे उद्गार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व उद्योजक डी बी गटकळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
प्रथम वर्ष विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक:
तृप्ती जाधव(समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे)
द्वितीय क्रमांक:
आर्यन कर्पे,सुरज घोडेकर (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक,संगमनेर)
तृतीय क्रमांक:
शिवानी भोर (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धा निकाल :
प्रथम क्रमांक:
प्रथमेश आनप (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक,संगमनेर )
द्वितीय क्रमांक:
श्रीतिज साठे(श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,नेप्ती)
तृतीय क्रमांक:
अनुजा साबळे (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक:
सुशांत बढे (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
द्वितीय क्रमांक:
अथर्व शिंदे व नीरज सूर्यवंशी (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
तृतीय क्रमांक:
विराज देशमुख व सुजल घोडेकर (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक,संगमनेर )
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग:
प्रथम क्रमांक:
ओम आहेर (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
द्वितीय क्रमांक:
संतोष पवन,ओम शितोळे (शासकीय तंत्रनिकेतन,पुणे)
तृतीय क्रमांक:
श्रद्धा दांगट (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
मेकॅनिकल,मेकॅट्रॉनिक्स व सिव्हिल विभाग:
प्रथम क्रमांक:
तनुजा थोरात (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
द्वितीय क्रमांक:
आकाश बटवाल (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
तृतीय क्रमांक:
प्रज्वल ढगे (समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे)
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व उद्योजक डी बी गटकळ यांच्या हस्ते करण्यात आला.
रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या स्पर्धेच्या पारितोषिका चे स्वरूप होते.
या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेचे नियोजन विभागप्रमुख प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.विशाल कांबळे,प्रा.श्याम फुलपगारे,प्रा.आदिनाथ सातपुते यांनी केले.ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्ध्येमध्ये प्रा.रविंद्र नवले व प्रा.अमोल दिघे यांनी परीक्षक म्हणून तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा चे विभागीय समन्वयक म्हणून प्रा.हुसेन मोमीन,प्रा.एन.व्हि भागवत यांनी काम पाहिले.