ट्रॅक्टर पलटी होऊन दोन मुलांचा मृत्यू ; एकजण गंभीर जखमी
1 min read
शिरोली सुलतानपूर दि.२१:-शिरोली सुलतानपूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात रांजणी (ता.आंबेगाव) येथील दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कुणाल मच्छिंद्र भोर (वय १६) ओम दत्तात्रय भोर (वय १६) व पार्थ सुदर्शन भोर (वय १७ वर्ष) सर्व रा. रांजणी ता.आंबेगाव) हे तिघेजण ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी घेऊन चालले होते. त्यावेळी कुणाल मच्छिंद्र भोर हा ट्रॅक्टर चालवत असताना अचानक ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात ट्रॅक्टर खाली येऊन कुणाल मच्छिंद्र भोर व ओम दत्तात्रय भोर हे दोघेजण जागीच मृत झाले. तर पार्थ सुदर्शन भोर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अशोक भोर यांनी मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.