भव्य शिवजन्मोत्सव व महाशिवरात्री ऊत्सवानिमीत्त बिरेवाडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

1 min read

संगमनेर दि.२३:- संगमनेर येथील बिरेवाडी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा तसेच महाशिवरात्री उत्सवानिमीत्त बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री महादेव मंदिर येथे विवीध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत शिवनेरी रक्तपेढी, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य रक्तदान शिबीर, भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर” तसेच मोफत मोतीबिंदू शस्रक्रियेतील रूग्णांना राहण्याची व जेवणाची सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ०७.०० ते ०९.०० वाजेपर्यंत स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित “छावा” चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन आणि तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समस्त ग्रामस्थ बिरेवाडी आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात येत असते.तरी या शिवजन्मोत्सव व महाशिवरात्री उत्सवात बिरेवाडी आणि साकुर पठारभागातील शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे