लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट, आता रेशन कार्डवर मिळणार…..

1 min read

मुंबई दि.२१:- लाडक्या बहिणींना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार असून शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे. एका कार्डावर एक साडी याप्रमाणे साड्यांचे वाटप केले जाणार आहे. अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड म्हणजे गरीब कुटुंबाना अनुदानित अन्न मिळवून देण्यासाठी भारत सरकारची योजना आहे. या रेशन कार्डधारकांना दरमहा अन्नधान्य मिळते. रेशन दुकानावर अन्नधान्य याच्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी म्हणजेच साधारण होळीपर्यंत हे साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सणासुदीचा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे